Posts

Showing posts from October, 2017

ती

writing in progress

शिक्षणाचे अपुरें स्वप्न

writing in progress

नेटेरिया फोफवतोय

writing on progress

गरीब होतकरु मुलांना सुवर्णसंधि

*गावखेड्यातील होतकरू मुलांसाठी फार आनंदाची गोष्ट...  की ,ज्यांची  बि. ए नंतर शिक्षणाची इच्छा असूनही .केवळ परिस्थीतीमुळे जी मुलं शिकू शकत नाही.अश्या सर्व मुलांना *महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय ,वर्धा येथे* निरनिराळे कोर्स सुरु केले आहेत, ज्यात एम,ए नंतर एम,फिल. .पीएच .डी यांचा समावेश आहे.येथे मुलांना एम,ए साठी 1000 रुपये महिना फेलोशिप दिली जाते. एम.फिल साठी 5000-8000 रुपये महिना तर पिएच. डी करिता 25000 रुपये महिना मिळतो.एम.ए च्या मुलांना एम,ए सोबत एक अन्य  भारतीय किंवा विदेशी भाषा शिकविली जाते सोबत कम्प्युटर कोर्स सुद्धा मोफत शिकविला जातो . वाय- फाय कॅम्पस असल्याने दिवसभर अमर्यादीत नेट वापरायला मिळतं .तेव्हा गावातील ज्या मुला मुलींची शिक्षणाची इच्छा असूनही ज्यांना केवळ परिस्थिती मुळे शिक्षण घेता येत नाही अशा सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ,*कारण या विश्वविद्यालयाबाबत फार प्रचार महाराष्ट्रात झाला नाही कृपया ही माहिती सर्वांना सांगा केवळ हिंदी प्रदेशातील मुलेच याचा लाभ घेत आहे,तेव्हा प्रत्येक मराठी मुलांना ही गोष्ट सांगा,त्या साठी *www.mgahv.org.com* या साइडला...

वाकळे सरांचे अभिनन्दन

Image

Vidyarthi divas

शाळेत साजरा होणार विद्यार्थी दिवस  डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. भारतीय समाजावर त्यांचे अनंत ऋण आहेत. त्यांच्या पुढाकारने व विचाराने देशात एक मोठी सामाजिक क्रांति झाली .        डॉ. आंबेडकर यांनी ७ नोवेम्बर १९०० रोजी सातारा येथील हायस्कूल मधे प्रथम प्रवेश घेतला .त्या शाळेच्या रजिस्टर मधे १९१४ क्रमांकाच्या समोर त्यांची स्वाक्षरी देखील आहे .शाळेने हा एतिहासिक दस्तावेज जपून ठेवला आहे. याचाच आधार घेवून शासन दरबारी मागणी होत होती की ७ नोवेम्बर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. शासनाने देखील ही बाब मान्य करून तश्या प्रकारचा शासन निर्णय काढला आहे. यासाठी शासनाचे खुप खुप आभार .     यापुढे हा दिवस राज्यातील सर्व शाळांमधे विद्यार्थी दिवस म्हणून मोठ्या आनंदात साजरा करण्यात येईल .यादिवशी विद्यार्थ्यांना डॉ .आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला जाईल .तसेच डॉ आंबेडकर यांच्यावर आधारित वक्तृत्व, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल .या महान व्यक्तीच्या जीवन चरित्राचे नवनवीन पैलू विद्या...

करणचि कमाल

Image
करणची कमाल* *जि प शाळेच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय झेप*   जि प शाळा गोवने येथे  सहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या   करण जगन खानलोडा या विद्यार्थ्याने चिल्ड्रन्स रेकॉर्ड बुक मधे *लोंगेस्ट टाइम स्टॅंडिंग ऑन टोज्*  या विक्रमाची नोंद केली आहे .ही संस्था जगभरातील लहान मुलांच्या विक्रमांची नोंद करत असते. आजपर्यंत युरोप अमेरिका सारख्या खंडातील अनेक कर्तृत्ववान मुलांनी या संस्थेत विक्रम नोंदवलेले आहेत .या यादीत माझा विद्यार्थी करनही जाऊन बसला आहे .        आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मी मुलांचा पायाच्या बोटांवर उभे राहण्याचा सराव घेत असताना त्यांच्या असे लक्षात आले की करण हा पंधरा मिनिटांपेक्षा ही जास्त वेळ बोटांवर ती उभा राहात आहे. इतर विद्यार्थ्यांपेक्षा तो खूप जास्त वेळ हे योगासन करत होता .करणचा हा वेगळेपणा ओळखून मी त्याला अधिक सराव करण्याचा सल्ला दिला व त्यास योग्य मार्गदर्शन केलेे .तू जर प्रामाणिकपणे सराव केला तर नक्कीच विक्रम नोंदवशिल असा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण केला .त्यानुसार करन ने सलग दोन तीन महिने घरी...

माझी जागा

Image
माझं शिवार नोकरी निमित्ताने वर्षभर गावापासून दूर रहावे लागते. कुटुंब मित्र सगे सोयरे सगळ्यांच्या आठवणी मनात घर करून असतात. असे असले तरी मला एकटे राहनेच जास्त आवडते. शिक्षकी पेशात नोकरीला असल्याने दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाता येते .सर्वांच्या भेटी गाठी होतात. स्नेहभोजनाच्या पंक्ति होतात. विचारांची अनुभवांची किस्यांची देवाण घेवान होते .सर्वांसोबत कसे छान वाटते. पण तरी एक अशी जागा आहे जिथे वेळ घालवल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. ती जागा म्हणजे आमचे शेत व शेताच्या बांधावर असलेले कडूलींबाचे झाड़. शेतात काम करण्याची मला विलक्षण आवड. सुट्टी लागली की आराम करता येईल यापेक्षा शेतात काम करता येईल या गोष्टीचा मला जास्त आनंद होतो .शेतात जे पिक असेल त्या पिकाला पाणी देणे ,वार्यावर डोलनारे हिरवेगार पिक पाहणे ,आकाशात भिरभिरणारी पाखर पाहणे या गोष्टी मनाला खुप् सुखावून जातात. भूक लागली की कडुलिंबाच्या झाडाख़ाली भाकर भाजी खातांना फाइव स्टार होटेल्स चा दिमाख ही फीका वाटतो. उन वाढलं की लिंबा च्या सावलित गार गार गवताच्या अंथरुणावर झोप कधी लागते ते कळत सुद्धा नाही. मधेच येणारा गार वारा अंगावर ज...

एका ट्रिप ची गोष्ट

Image
उन्हाळ्याची सुट्टी लागली होती .आम्ही सुट्टी साठी गावी आलो होतो. सुट्टी मधे कुठे तरी फिरायला जायचे नियोजन करत होतो .पण आई म्हणाली," उन्हाचे दिवस आहेत. सोबत लहान मुले आहेत .एका दिवसात परत येतील असे ठिकाण निवड आणि जा फिरायला ."तीचेही म्हणणे रास्तच होते. मी ठरवले की आपण पेमगिरि ला जायचे .हो पेमगिरि राजमाता जिजाऊ साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले संगमनेर तालुक्यातील एक गांव .जिजाऊ साहेब गरोदर असतांना याच् पेमगिरि गावातील किल्ल्यावर त्यांना ठेवण्यात आले होते. नंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना शिवनेरी येथे हलविण्यात आले .पेमगिरि महावटवृक्षासाठीही प्रसिद्द आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा वड याच गावात आहे. मी माझी पत्नी सरला व मूली साईश्वरी व आरोही स्कूटी वरच फिरायला निघालो .घरापासून एक तासचे अंतर होते बघता बघता पेमगिरि किल्ला दिसायला लागला. मी मनोमन  राजमाता जिजाऊ साहेबांच्या पवित्र स्मृतिस मुजरा केला. क्षणभर वाटले शिवरायांचा जन्म याच किल्ल्यावर झाला असता तर ? पण कदाचित नियातीच्या तसे मनात नसावे .आम्ही किल्ल्यावर जाउन आलो. क्षणभर तिथे विसवलो .मूली आनंदाने गडावर बागडत होत्या. का क...

अन् तिची पायपीट थांबली

likhan suru aahe

वृक्षारोपण एक पुण्यकर्म

Image
वृक्षारोपण एक पुण्यकर्म पाप आणि पुण्य या भारतातील अतिशय प्राचीन संकल्पना .पण पाप आणी पुण्य या संदर्भात अनेक मतभेद भारतामध्ये दिसून येतात . पाप आणि पुण्य यांची नेमकी व्याख्या करणे देखील कठिणच . नक्की कोणती कृती हे पुण्य कर्म आहे आणि कोणती कृती हे पाप कर्म आहे याबद्दल देखील स्पष्टता दिसून येत नाही .साधारणपणे इतरांना त्रास होईल अशा प्रकारची कृती ही पाप समजले जाते .तर ज्या कृतीमुळे इतरांना आनंद फायदा होईल ती कृती पुण्य समजली जाते .मात्र पुण्य कमविण्यासाठी भारतातील काही अंधश्रद्धाळू लोक वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसतात. जसे की नाम जप करणे, ग्रंथ पोथ्या यांची पारायणे करणे, मंदिरामध्ये जाऊन तासंतास रांगेमध्ये उभे राहणे, नद्यांमध्ये स्नान करणे याला लोक पुण्यकर्म समजतात. धर्मविरोधी कृती करणे हे पाप कर्म आहे असे अनेक आजही मानतात .मात्र मला जर कोणी विचारले की पुण्य कमावण्यासाठी तुम्ही कोणते कर्म कराल तर माझे उत्तर एकच असेल " वृक्षारोपण ".       माझ्यामध्ये ज्ञानदान व वृक्षारोपण हे दोन असे कर्म आहेत की आपल्या हयातीनंतर सुद्धा त्याचा फायदा समाजातील घटकांना होत असतो .एक उदाहरणच बघू...

प्रदूषणमुक्त दिवाळी

Image
प्रदूषणमुक्त दिवाळी  दिवाळी आपण सर्व मोठ्या आनंदाने साजरी करतो.        दिवाळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी कोणतीही कसर आपण ठेवत नाही.नवीन कपडे, फराळ ,रांगोळी ,सजावट या सर्व गोष्टींची  रेलचेल असते .हे सर्व  करण्यामुळेच दिवाळीची खरी रंगत असते .पण आपल्या सर्वांचा  भ्रम झालेला आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात फटाके फोडणार तेवढी दिवाळी आनंदात साजरी होते . आजकाल विविध सामाजिक संस्था, समाजातील जागरूक नागरिक यांनी प्रदूषणमुक्त दिवाळीची एक सामाजिक चळवळच सुरू केलेली आहे. परंतु तरीही फटाके खरेदी -विक्री आणि फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झालेले दिसून येत नाही .उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे.मागील वर्षी दिवाळी सनाच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली हे शहर दोन दिवस  धुराने पूर्ण झाकले गेले होते .प्रचंड प्रमाणात ध्वनी व वायू प्रदूषण तेथे झाले होते. अशा घटनांपासून आपण बोध घ्यायला हवा.प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी एक खूणगाठ बांधायला हवी की फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण ,ध्वनीप्रदूषण ,कचऱ्याची समस्या ही देशातील सर्व नागरिकांसाठी  धोकादायक बाब असून यापुढे देशासाठी हा ...

शाळा डिजिटल करतांना

Image
*डिजिटल शाळा करताना* गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर डिजिटल शाळा हा शिक्षण क्षेत्रांत नवीन प्रयोग आपणास प्रकर्षाने ऐकायला, बघायला  व अनुभवायला मिळाला." डिजिटल शाळा" हि एक चळवळच स्वयंप्रेरणेने महाराष्ट्रावर शिक्षकांनी सुरू केली  आणि त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक  डिजिटल शाळा करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्नशील होते आणि त्यात यश प्राप्त करत होते .          माझ्या मनातहि आपण डिजिटल शाळा करावी अशी सुप्त इच्छा या चळवळीमुळे निर्माण झाली होती .परंतु सर्वात मोठा प्रश्न होता कसे ?  आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवने तालुका डहाणू जिल्हा पालघर ही संपूर्ण ग्रामीण भागात व आदिवासी क्षेत्रातील शाळा असून शाळेमध्ये पहिली ते सातवी एकूण चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शाळेत एकूण सात वर्ग खोल्या उपलब्ध आहेत  त्यामुळे संपूर्ण सात वर्ग डिजिटल करणे व त्यासाठी निधी संकलन करणे हि एक नक्कीच मोठी बाब होती आणि गावातील मोलमजुरी शेती करणाऱ्या पालकांकडून एवढा मोठा निधी जमा करणे कितपत योग्य आहे ?असा प्रश्न माझ्या मना...

चला विक्रमविर बनूया

Image
चला विक्रमवीर बनूयात*   आपल्याला सर्वांना नवीन काहीतरी करण्याची इच्छा असते. परंतु काय करावे? हा प्रश्न आपल्याला पडतो .मार्ग सापडत नाही .चला तर मग या सुट्टीमध्ये आपल्यामध्ये असलेले कौशल्य, वेगळेपणा ओळखुया आणि नवे नवे विक्रम स्थापन करूया . तुम्ही सर्वांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड हे नाव ऐकले असेलच.परंतु यामध्ये विक्रम प्रस्थापित करणे ही किचकट प्रक्रिया असल्याने अनेकजण तिथे विक्रम नोंदवण्याचा प्रयत्नच करत नाही. म्हणून ;आज मी तुम्हाला विक्रम नोंदवणाऱ्या काही भारतीय संस्थांची माहिती सांगणार आहे .ज्यामध्ये आपण आपले विक्रम नोंदवू शकता . भारतामध्ये इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड आणि चिल्ड्रेन रेकॉर्ड्स बुक या ठिकाणी आपण आपला विक्रम नोंदवू शकता . कसे ते पाहुया .या संस्था तीन वर्षांपर्यंत ,तीन ते सात वर्षांपर्यंत सुपरहिट किड , सात ते बारा वर्षांपर्यंत लिटल चॅम्प्स ; बारा ते सोळा वर्षांपर्यंत टॅलेंटेड तीन आणि सोळा वर्षांच्या पुढे यंग अचीवर या वेगवेगळ्या कॅटेगिरीमध्ये विक्रमांची नोंद करत असतात .वरील विविध कॅटेगिरीमध्ये तुम्ही अनेक विक्रम नोंदवू शकता .सर्वप्रथम तुमच्याकडे काय वेगळेपणा आह...
Image
*सुखी राहजोस् * पालघर जिल्ह्यात डहाणू तालुका हा भौगोलिक दृष्टया अतिशय संपन्न असा तालुका आहे. पश्चिमेला विस्तृत असा सागरी किनारा .पूर्वेला जव्हार च्या डोंगर रांगा.चहुबाजुंनी घनदाट वृक्ष असा निसर्ग सौंदर्याने नटलेला हा तालुका पर्यटकांना भुरळ घालत असतो .तालुक्याच्या पूर्वेला कोसेसरी नावाचे गांव हे सूर्या नादिवरील  धामनी धरण व कवडास बंधारा या दोन्ही प्रकल्पांच्या बरोबर मधे आहे. गावाच्या दक्षिनेला बारमाहि वाहनारी सूर्या नदी .नदिवर कोणत्याही प्रकारचा पुल नसल्याने मुख्य रस्त्यावर येण्यासाठी गावकरी व विद्यार्थी होडीचाच वापर करतात. पावसाळ्यात धरण भरले की नदीला मोठा पुर येतो .या पुरातून होड़ी नेणे म्हणजे जीवघेणा प्रवास .पण नाइलाजाने येथील आदिवासी बांधवांना हा प्रवास करावाच लागतो .         मला या होडीचे खुप आकर्षण वाटते .होडीत बसून स्वतः च्या हाताने होड़ी वल्हवायला खुप मजा येते. पुराच्या पान्यातुन होड़ी एका तिरावरून दुसऱ्या तिरावर न्यायाची मजा काही औरच् .    एके दिवशी मी माझ्या मित्रांसोबत सहज फिरायला कोसेसरी ला गेलो होतो.होडीतून पलिकडच्या किनार्या...