एका ट्रिप ची गोष्ट

उन्हाळ्याची सुट्टी लागली होती .आम्ही सुट्टी साठी गावी आलो होतो. सुट्टी मधे कुठे तरी फिरायला जायचे नियोजन करत होतो .पण आई म्हणाली," उन्हाचे दिवस आहेत. सोबत लहान मुले आहेत .एका दिवसात परत येतील असे ठिकाण निवड आणि जा फिरायला ."तीचेही म्हणणे रास्तच होते. मी ठरवले की आपण पेमगिरि ला जायचे .हो पेमगिरि राजमाता जिजाऊ साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले संगमनेर तालुक्यातील एक गांव .जिजाऊ साहेब गरोदर असतांना याच् पेमगिरि गावातील किल्ल्यावर त्यांना ठेवण्यात आले होते. नंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना शिवनेरी येथे हलविण्यात आले .पेमगिरि महावटवृक्षासाठीही प्रसिद्द आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा वड याच गावात आहे. मी माझी पत्नी सरला व मूली साईश्वरी व आरोही स्कूटी वरच फिरायला निघालो .घरापासून एक तासचे अंतर होते बघता बघता पेमगिरि किल्ला दिसायला लागला. मी मनोमन राजमाता जिजाऊ साहेबांच्या पवित्र स्मृतिस मुजरा केला. क्षणभर वाटले शिवरायांचा जन्म याच किल्ल्यावर झाला असता तर ? पण कदाचित नियातीच्या तसे मनात नसावे .आम्ही किल्ल्यावर जाउन आलो. क्षणभर तिथे विसवलो .मूली आनंदाने गडावर बागडत होत्या. का कोणास ठाऊक ?तिथे राजमाता जिजाऊ साहेबांचा त्यांना आशीर्वाद मिळतो आहे अशी सुप्त जाणीव मनाला होत होती .गडावरुनच तो विशाल महावटवृक्ष आम्हाला त्याच्या सावलीत येण्यासाठी खुणावत होता .आम्ही भरभर गड उतरून खाली आलो .एका नजरेत मावणार नाही एवढ्या विस्तीर्ण जागेत तो वड पसरला होता. त्याची भव्यता यापूर्वी कधीही न पहिलेली अशीच होती .सगळीकडे गर्द अशी थंड सावली पसरली होती .पर्यटकांची तोबा गर्दी होती .कोणी फ़ोटो काढण्यात दंग ;कोणी पारंब्यावर झोके घेत होते ;तर कोणी झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होते .साईश्वरी व आरोही सुद्धा पारंब्यावर आनंदाने झोके घेत होत्या. मी खुप् शांतपणे तो विशाल महावटवृक्ष न्याहळत होतो .आम्ही त्या झाडाच्या पारंब्यावर खुप् खेळलो. सुन्दर सुन्दर फ़ोटो काढले .झाडाच्या सावलीत बसून छान पैकी जेवण केले. काहीही केल्या तिथून पाय निघतच नव्हता. पण संध्याकाळ झाली होती .आम्हाला तिथून निघने भागच होते. खुप् आनंदी मनाने आम्ही त्या महावृक्षाचा निरोप घेतला .


लेख 
विजय पावबाके पालघर
   

Comments

Popular posts from this blog

माझा नवोपक्रम

शाळा डिजिटल करतांना

वृक्षारोपण एक पुण्यकर्म