करणचि कमाल


करणची कमाल*
*जि प शाळेच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय झेप* 

 जि प शाळा गोवने येथे  सहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या   करण जगन खानलोडा या विद्यार्थ्याने चिल्ड्रन्स रेकॉर्ड बुक मधे *लोंगेस्ट टाइम स्टॅंडिंग ऑन टोज्*  या विक्रमाची नोंद केली आहे .ही संस्था जगभरातील लहान मुलांच्या विक्रमांची नोंद करत असते. आजपर्यंत युरोप अमेरिका सारख्या खंडातील अनेक कर्तृत्ववान मुलांनी या संस्थेत विक्रम नोंदवलेले आहेत .या यादीत माझा विद्यार्थी करनही जाऊन बसला आहे .
       आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मी मुलांचा पायाच्या बोटांवर उभे राहण्याचा सराव घेत असताना त्यांच्या असे लक्षात आले की करण हा पंधरा मिनिटांपेक्षा ही जास्त वेळ बोटांवर ती उभा राहात आहे. इतर विद्यार्थ्यांपेक्षा तो खूप जास्त वेळ हे योगासन करत होता .करणचा हा वेगळेपणा ओळखून मी त्याला अधिक सराव करण्याचा सल्ला दिला व त्यास योग्य मार्गदर्शन केलेे .तू जर प्रामाणिकपणे सराव केला तर नक्कीच विक्रम नोंदवशिल असा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण केला .त्यानुसार करन ने सलग दोन तीन महिने घरी सराव केला. त्यानंतर त्याच्या पायाच्या बोटांवर उभे राहण्याच्या कृतीचा व्हिडिओ बनवताना करण तब्बल तेहेतीस मिनटे एकवीस सेकंद पायाच्या बोटांवर उभा राहिला .त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ चिल्ड्रन्स रेकॉर्ड बुक या ठिकाणी रेकॉर्ड नोंदवण्यासाठी पाठवण्यात आला. रेकॉर्ड प्रोसेसिंग टीमकडून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मला  मेल प्राप्त झाला की  करणच्या जास्ती जास्त वेळ पायाच्या बोटांवर उभे राहण्याच्या विक्रमाची चिल्ड्रन्स रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्यात आली. त्याचे रेकॉर्ड सर्टिफिकेट  मिळण्यासाठी रोटरी क्लबच्या रुक्साना यांनी करणला हजार रुपयांची मदत केली.करनच्या या यशाबद्दल गोवणे शाळेच्या  सर्व शिक्षकांकडून त्याला खूप खूप शुभेच्छा . 

विजय पावबाके पालघर

Comments

Popular posts from this blog

माझा नवोपक्रम

शाळा डिजिटल करतांना

वृक्षारोपण एक पुण्यकर्म