माझी जागा
माझं शिवार
नोकरी निमित्ताने वर्षभर गावापासून दूर रहावे लागते. कुटुंब मित्र सगे सोयरे सगळ्यांच्या आठवणी मनात घर करून असतात. असे असले तरी मला एकटे राहनेच जास्त आवडते. शिक्षकी पेशात नोकरीला असल्याने दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाता येते .सर्वांच्या भेटी गाठी होतात. स्नेहभोजनाच्या पंक्ति होतात. विचारांची अनुभवांची किस्यांची देवाण घेवान होते .सर्वांसोबत कसे छान वाटते. पण तरी एक अशी जागा आहे जिथे वेळ घालवल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. ती जागा म्हणजे आमचे शेत व शेताच्या बांधावर असलेले कडूलींबाचे झाड़. शेतात काम करण्याची मला विलक्षण आवड. सुट्टी लागली की आराम करता येईल यापेक्षा शेतात काम करता येईल या गोष्टीचा मला जास्त आनंद होतो .शेतात जे पिक असेल त्या पिकाला पाणी देणे ,वार्यावर डोलनारे हिरवेगार पिक पाहणे ,आकाशात भिरभिरणारी पाखर पाहणे या गोष्टी मनाला खुप् सुखावून जातात. भूक लागली की कडुलिंबाच्या झाडाख़ाली भाकर भाजी खातांना फाइव स्टार होटेल्स चा दिमाख ही फीका वाटतो. उन वाढलं की लिंबा च्या सावलित गार गार गवताच्या अंथरुणावर झोप कधी लागते ते कळत सुद्धा नाही. मधेच येणारा गार वारा अंगावर जणू पांघरुनच घालत असतो .
ही जागा; या जागेत केलेला स्वसंवाद मला खुप् आत्मिक समाधान देवून जातो .कामावर परतल्यावर हे सुवर्णक्षण अनुभवताच येत नाहीत .पण मनात जपलेल्या आमच्या हिरव्या शिवाराच्या आठवणी माझे मनहि हिरवेगार ठेवतात .नेहमीच.
लेख


Comments
Post a Comment