माझा नवोपक्रम
उपक्रम *बहू उद्देशीय इंग्रजी अध्ययन अध्यापन बोर्डवर बनवा असंख्य इंग्रजी शब्द व वाक्य* नवोपक्रमशील शिक्षक श्री विजय बाळासाहेब पावबाके जि प शाळा गोवणे ता डहाणू जि पालघर ४०११०३ सन २०१७-१८ 🔹 नवोपक्रमाचे शीर्षक :- *बहू उद्देशीय इंग्रजी अध्ययन अध्यापन बोर्डवर बनवा असंख्य इंग्रजी शब्द व वाक्य* 🔹 नवोपक्रमाची गरज व महत्त्व :- गरज :- बदलत्या काळानुसार शिक्षणात वेगवेगळ्या सहित्यांचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे . त्यासाठी शाळेत पुरेशा प्रमाणात विविध प्रकारचे दर्जेदार साहित्य असणे आवश्यक होते. आमची शाळा पाहिली ते सातवी पर्यन्त असून शाळेत एकूण सात वर्गखोल्या आहेत .शाळेत जवळ जवळ चारशे विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहे . दैनंदिन अध्यापन करतांना एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इंग्रजी भाषे विषयी मुलांच्या मनात न्यूनगंड दिसून येतो . तसेच इंग्रजी अध्ययन करतांना मुले इतर विषयांच्या तुलनेत जास्त आनंदी दिसून येत नाहीत . इंग्रजी अध्ययनात मुलांना गोडी वाटावी व त्यांनी स्व कृतीतुन इंग्रजी शब्द व वाक्य बनवावे असे मला वाटत होते . त्यासाठी बहू...
Comments
Post a Comment