प्रदूषणमुक्त दिवाळी
प्रदूषणमुक्त दिवाळी
दिवाळी आपण सर्व मोठ्या आनंदाने साजरी करतो. दिवाळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी कोणतीही कसर आपण ठेवत नाही.नवीन कपडे, फराळ ,रांगोळी ,सजावट या सर्व गोष्टींची रेलचेल असते .हे सर्व करण्यामुळेच दिवाळीची खरी रंगत असते .पण आपल्या सर्वांचा भ्रम झालेला आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात फटाके फोडणार तेवढी दिवाळी आनंदात साजरी होते . आजकाल विविध सामाजिक संस्था, समाजातील जागरूक नागरिक यांनी प्रदूषणमुक्त दिवाळीची एक सामाजिक चळवळच सुरू केलेली आहे. परंतु तरीही फटाके खरेदी -विक्री आणि फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झालेले दिसून येत नाही .उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे.मागील वर्षी दिवाळी सनाच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली हे शहर दोन दिवस धुराने पूर्ण झाकले गेले होते .प्रचंड प्रमाणात ध्वनी व वायू प्रदूषण तेथे झाले होते. अशा घटनांपासून आपण बोध घ्यायला हवा.प्रत्येकाने स्वतःच्या मनाशी एक खूणगाठ बांधायला हवी की फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण ,ध्वनीप्रदूषण ,कचऱ्याची समस्या ही देशातील सर्व नागरिकांसाठी धोकादायक बाब असून यापुढे देशासाठी हा धोका तयार करण्यास माझा वाटा असणार नाही .तसेच मी माझे कुटुंब, मित्र यांना फटाके फोडण्यापासून परावृत्त करून पारंपरिक पद्धतीने आनंदाने दिवाळी साजरी करु.सर्वांना प्रदूषणमुक्त दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा .



Comments
Post a Comment