Vidyarthi divas
शाळेत साजरा होणार विद्यार्थी दिवस
डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. भारतीय समाजावर त्यांचे अनंत ऋण आहेत. त्यांच्या पुढाकारने व विचाराने देशात एक मोठी सामाजिक क्रांति झाली .
डॉ. आंबेडकर यांनी ७ नोवेम्बर १९०० रोजी सातारा येथील हायस्कूल मधे प्रथम प्रवेश घेतला .त्या शाळेच्या रजिस्टर मधे १९१४ क्रमांकाच्या समोर त्यांची स्वाक्षरी देखील आहे .शाळेने हा एतिहासिक दस्तावेज जपून ठेवला आहे. याचाच आधार घेवून शासन दरबारी मागणी होत होती की ७ नोवेम्बर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. शासनाने देखील ही बाब मान्य करून तश्या प्रकारचा शासन निर्णय काढला आहे. यासाठी शासनाचे खुप खुप आभार .
यापुढे हा दिवस राज्यातील सर्व शाळांमधे विद्यार्थी दिवस म्हणून मोठ्या आनंदात साजरा करण्यात येईल .यादिवशी विद्यार्थ्यांना डॉ .आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला जाईल .तसेच डॉ आंबेडकर यांच्यावर आधारित वक्तृत्व, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल .या महान व्यक्तीच्या जीवन चरित्राचे नवनवीन पैलू विद्यार्थ्यांसमोर येतील व विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण होईल . सर्वांना विद्यार्थी दिवस साजरा करण्यासाठी खुप् खुप शुभेच्छा
लेख
विजय पावबाके
पालघर
Comments
Post a Comment