वृक्षारोपण एक पुण्यकर्म पाप आणि पुण्य या भारतातील अतिशय प्राचीन संकल्पना .पण पाप आणी पुण्य या संदर्भात अनेक मतभेद भारतामध्ये दिसून येतात . पाप आणि पुण्य यांची नेमकी व्याख्या करणे देखील कठिणच . नक्की कोणती कृती हे पुण्य कर्म आहे आणि कोणती कृती हे पाप कर्म आहे याबद्दल देखील स्पष्टता दिसून येत नाही .साधारणपणे इतरांना त्रास होईल अशा प्रकारची कृती ही पाप समजले जाते .तर ज्या कृतीमुळे इतरांना आनंद फायदा होईल ती कृती पुण्य समजली जाते .मात्र पुण्य कमविण्यासाठी भारतातील काही अंधश्रद्धाळू लोक वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसतात. जसे की नाम जप करणे, ग्रंथ पोथ्या यांची पारायणे करणे, मंदिरामध्ये जाऊन तासंतास रांगेमध्ये उभे राहणे, नद्यांमध्ये स्नान करणे याला लोक पुण्यकर्म समजतात. धर्मविरोधी कृती करणे हे पाप कर्म आहे असे अनेक आजही मानतात .मात्र मला जर कोणी विचारले की पुण्य कमावण्यासाठी तुम्ही कोणते कर्म कराल तर माझे उत्तर एकच असेल " वृक्षारोपण ". माझ्यामध्ये ज्ञानदान व वृक्षारोपण हे दोन असे कर्म आहेत की आपल्या हयातीनंतर सुद्धा त्याचा फायदा समाजातील घटकांना होत असतो .एक उदाहरणच बघू...
Comments
Post a Comment