चला विक्रमविर बनूया
आपल्याला सर्वांना नवीन काहीतरी करण्याची इच्छा असते. परंतु काय करावे? हा प्रश्न आपल्याला पडतो .मार्ग सापडत नाही .चला तर मग या सुट्टीमध्ये आपल्यामध्ये असलेले कौशल्य, वेगळेपणा ओळखुया आणि नवे नवे विक्रम स्थापन करूया .
तुम्ही सर्वांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड हे नाव ऐकले असेलच.परंतु यामध्ये विक्रम प्रस्थापित करणे ही किचकट प्रक्रिया असल्याने अनेकजण तिथे विक्रम नोंदवण्याचा प्रयत्नच करत नाही. म्हणून ;आज मी तुम्हाला विक्रम नोंदवणाऱ्या काही भारतीय संस्थांची माहिती सांगणार आहे .ज्यामध्ये आपण आपले विक्रम नोंदवू शकता . भारतामध्ये इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड आणि चिल्ड्रेन रेकॉर्ड्स बुक या ठिकाणी आपण आपला विक्रम नोंदवू शकता .
कसे ते पाहुया .या संस्था तीन वर्षांपर्यंत ,तीन ते सात वर्षांपर्यंत सुपरहिट किड , सात ते बारा वर्षांपर्यंत लिटल चॅम्प्स ; बारा ते सोळा वर्षांपर्यंत टॅलेंटेड तीन आणि सोळा वर्षांच्या पुढे यंग अचीवर या वेगवेगळ्या कॅटेगिरीमध्ये विक्रमांची नोंद करत असतात .वरील विविध कॅटेगिरीमध्ये तुम्ही अनेक विक्रम नोंदवू शकता .सर्वप्रथम तुमच्याकडे काय वेगळेपणा आहे हा ओळखायला हवा .तुमच्याकडे जर तुमच्या आवडीच्या वस्तूंचे कलेक्शन असेल तर लार्जेस्ट कलेक्शन म्हणून तुम्ही विक्रम नोंदवू शकता. याशिवाय इतरांपेक्षा फास्टेस्ट केलेली अॅक्टिव्हिटी ; इतरांपेक्षा तुम्ही बनवलेली स्मॉलेस्ट वस्तू किंवा तुम्ही बनवलेली बिगेस्ट वस्तू अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमचा विक्रम होऊ शकतो .तुमच्यामध्ये असलेल्या योगा; स्पोर्ट्स; अॅथेलेटिक्स यांचा कौशल्यांमध्ये सुद्धा तुम्ही विक्रम करू शकता . एखादी कृती कमीत कमी वेळेत पूर्ण करणे किंवा एखादी अॅक्टिव्हिटी जास्तीत जास्त वेळ करणे यामध्ये सुद्धा आपला विक्रम होऊ शकतो. चला तर मग करायचा ना विक्रम .सर्वप्रथम तुम्ही तुमच्या विक्रमासाठी व्हिडिओ बनवणे आवश्यक आहे .तो व्हिडिओ बनवल्यानंतर शक्य असल्यास तो आपल्या यूट्यूब चॅनलवर सेव करा आणि त्याची लिंक आपल्याकडे कॉपी करून ठेवा. यासाठी आपले ईमेल अकाउंट असणेही गरजेचे आहे बर का .
आता www.indiasworldrecord.in किंवा www.childrenrecordsbook.com यापैकी एका संकेतस्थळावर जा . apply for records या टॅब वर क्लिक करा. एक फॉर्म ओपन होईल यात तुमचे नाव; पत्ता; फ़ोन नंबर; ईमेल ;आयडी प्रूफ व तुम्ही बनवलेल्या वीडियो ची लिंक इ. माहिती भरा . सर्वात शेवटी sumbit फॉर्म यावर क्लिक करा . रेकॉर्ड प्रोसेसिंग टीम तुमच्या महितीचे वेरिफिकेशन करेल .तुमची माहिती सर्व निकष पूर्ण करत असेल तर एक दोन आठवडयातच तुम्हाला या संस्थाकडून मेल येईल की अभिनंदन तुमच्या करून प्राप्त माहिती व पुराव्यांच्या आधारे तुमच्या रेकॉर्ड ची नोंद झाली आहे .यानंतर योग्य ती फी आकारून आपल्या रेकॉर्ड चे प्रमाणपत्र, मेडल व ट्रॉफी आपल्या पत्त्यावर पोहोच होते. मित्रांनो तो आनंद खुप वेगळा आहे .नंतर अनेक प्रिंट व वीडियो माध्यमे आपल्या रेकॉर्ड ची दखल घेतात .समाजात आपली एक वेगळी ओळख निर्माण होते .
मित्रांनो हा अनुभव मी स्वतः घेतला असून माझी मुलगी दोन वर्षांची असतांना तिने इंडियाज़ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेत पाठांतर क्षमतेच्या जोरावर चार विक्रम नोंदवले होते . तेव्हा जवळ जवळ सहा सात मराठी न्यूज़ चॅनेल ने या बातमिस प्रसिद्धि दिली . तिच्या पाठांतर क्षमतेस योग्य न्याय मिळाल्याचे समाधान आम्हास मिळाले .चला तर मग तुम्हीही तुमच्यात लपलेल्या गुणांना शोधा आणि या सुट्टी मधे मन लावून सराव करा .अनेक विक्रम तुम्हाला खुणावत आहेत . मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही त्या विक्रमांना नक्कीच गवसणी घालणार .
लेखक :
विजय बाळासाहेब पावबाके
प्राथमिक शिक्षक










Comments
Post a Comment