जीवन गौरव लेख
विषय :- विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास *जि प शाळेच्या विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय झेप* शरीर मन व बुद्धिचा विकास करते ते खरे शिक्षण होय . आजकाल सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर अधिक भर दिला जातो . विशेष म्हणजे पालकांनाही यात काही वावगे वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाकडे त्यातुलनेत खूपच कमी लक्ष दिले जाते .परंतु प्रत्येक वर्गात असे काही विद्यार्थी असतात ज्यांचा कल पुस्तकी शिक्षणापेक्षा त्यांच्या आवडीच्या कलाकुसरीच्या क्रीड़ाप्रकाराच्या गोष्टीकडे जास्त असतो . त्यांच्या या आवडीला जर कुटुंबाचा व शिक्षकांचा पाठिंबा मिळाला तर ते विद्यार्थी चमत्कार करु शकतात . आज डहाणू मधील अशाच दोन विद्यार्थ्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत ज्यांनी आपल्या मेहनतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर धड़क मारली आहे . स्लिंगशॉट हे नाव आपण ऐकलेच असेल .स्लिंगशॉट म्हणजे गलोल च्या सहाय्याने नेमबाजी करणे . पालघर जिल्ह्यात बहुतांश मुलांना गलोलची भारी आवड़. अनेक मुले गलोल चालविण्यात अतिशय पारंगत आहेत . अजय सखा...