माझा नवोपक्रम

उपक्रम 
*बहू उद्देशीय इंग्रजी अध्ययन अध्यापन बोर्डवर बनवा असंख्य इंग्रजी शब्द व वाक्य*
  नवोपक्रमशील शिक्षक
श्री विजय बाळासाहेब पावबाके

जि प शाळा गोवणे ता डहाणू जि पालघर ४०११०३

सन २०१७-१८

🔹 नवोपक्रमाचे शीर्षक :- *बहू उद्देशीय इंग्रजी अध्ययन अध्यापन बोर्डवर बनवा असंख्य इंग्रजी शब्द व वाक्य*
🔹 नवोपक्रमाची गरज व महत्त्व :- 
गरज :-
बदलत्या काळानुसार शिक्षणात वेगवेगळ्या सहित्यांचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे . त्यासाठी शाळेत पुरेशा प्रमाणात विविध प्रकारचे दर्जेदार  साहित्य असणे आवश्यक होते. आमची शाळा पाहिली ते सातवी पर्यन्त असून शाळेत एकूण सात वर्गखोल्या आहेत .शाळेत जवळ जवळ चारशे विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहे . दैनंदिन अध्यापन करतांना एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इंग्रजी भाषे विषयी मुलांच्या मनात न्यूनगंड दिसून येतो . तसेच  इंग्रजी अध्ययन करतांना मुले इतर विषयांच्या तुलनेत  जास्त आनंदी दिसून येत नाहीत . इंग्रजी अध्ययनात मुलांना गोडी वाटावी व त्यांनी स्व कृतीतुन इंग्रजी शब्द व वाक्य बनवावे असे मला वाटत होते . त्यासाठी बहू उद्देशीय इंग्रजी अध्ययन अध्यापन बोर्ड बनवायचा व त्याचा दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत नियमित वापर करायचा असे मी ठरवले . 

महत्त्व :-
 इंग्रजी अध्ययन अध्यापन कृतियुक्त  होण्यासाठी सदर नवोपक्रम महत्त्वाचा होता . तसेच विद्यार्थ्यांना त्या विषयाची गोडी लागावी , त्यांची शब्द संपदा वाढावी , त्यांना वाक्यनिर्मिती करता यावी , शब्द व वाक्य लेखन करतांना चूका कमी व्हाव्यात , यमक जुळणारी जास्तीत जास्त शब्द तयार करता यावीत यासाठी सदर नवोपक्रम महत्त्वाचा होता . 

🔹 नाविन्य / वैशिष्ट्य :-
      सदर उपक्रमाची अतिशय नविन्यपूर्ण असून त्याचे वैशिष्ट्य खालील प्रमाणे 
१] सदर उपक्रमासाठी तयार केलेला बोर्ड पूर्णतः माझ्या संकल्पनेतून तयार झाला असून तो मार्केट मधे कुठेही उपलब्ध नाही.
२] सदर बोर्ड ची unique English  language learning board म्हणून नॅशनल रेकॉर्ड बुक मधे नोंद  .
३] या बोर्ड चा वापर करून विद्यार्थी असंख्य इंग्रजी शब्द व वाक्य बनवु शकतात हे याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे .
🔹उद्दिष्टे

१] असंख्य इंग्रजी शब्द बनवता येतील असा बोर्ड तयार करणे
२] या बोर्ड चा दैंनंदिन अध्यापनात वापर करणे ३] विद्यार्थ्यांचा इंग्रजी शब्द संग्रह वाढवणे४] शब्दलेखन करतांना होणाऱ्या स्पेलिंग च्या चूका कमी करणे ५] बोर्ड च्या सहाय्याने असंख्य यमक जुळणारे शब्द तयार करणे६] विविध अंक अक्षरात लिहन्याचा सराव करणे ७] कृतियुक्त व आनंद दायी पद्धतीने इंग्रजी अध्ययन अध्यापन करणे ८] छोटी साधी सोपी इंग्रजी वाक्य तयार करणे ९] समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचा संग्रह वाढवने१०] इंग्रजी विषयाची भीती दूर करणे

🔹 उपक्रमाची व्याप्ती व मर्यादा 

सदर उपक्रम हा जि प शाळा गोवणे ता डहाणू मधील इयत्ता सहावी ब मधील ४८ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित आहे.बहू उद्देशीय इंग्रजी अध्ययन अध्यापन बोर्डचा वापर  या विषयापुरता मर्यादित आहे .

🔹नियोजन:- 

सदर नवोपक्रमाचे नियोजन खालील टप्प्यात करण्यात आले .
१. बहू उद्देशीय इंग्रजी अध्ययन अध्यापन बोर्ड चा आराखडा तयार करणे 
  
२. बहू उद्देशीय इंग्रजी अध्ययन अध्यापन बोर्ड तयार करणे 
३. खालील घटकापुरता बोर्ड च्या वापरापूर्वी व वापरानंतर झालेला परिणाम अभ्यासने. त्यासाठी आराखडा तयार करणे . व खालील घटकांना अनुसरुण अध्यापन करणे .

अ)पाच मिनिटांत जास्तीत जास्त इंग्रजी शब्द अचूक लिहता येणे .ब) पाच मिनिटांत जास्तीत जास्त इंग्रजी वाक्य अचूक लिहिता येणे. क) पाच मिनिटांत जास्तीत जास्त यमक जुळणारे शब्द लिहिणे .ड ) पाच मिनिटांत जास्तीत जास्त संख्याचे अक्षरात लेखन करणे .इ) तोंडी सांगितलेल्या शब्दांचे अचूक स्पेलिंग लिहिणे. फ ) मोठ्या शब्दांपासून छोटे पण अर्थपूर्ण शब्द तयार करणे .
४. पूर्व चाचणी  व उत्तर चाचणी चे तयार करने . चाचणी चे मूल्यमापन करणे .
५. मूल्यमापणातून प्राप्त महितीचे विश्लेषण करणे.
६.दोन्ही चाचण्यामधून प्राप्त माहितीच्या आधारे उपक्रमाची परिणामकारकता पडताळणे 
  

  🔹 वेळापत्रक (कार्यवाहीचे टप्पे) 
   १.बहू उद्देशीय इंग्रजी अध्ययन अध्यापन बोर्ड चा आराखडा तयार करणे - ३ दिवस 
  
२. बहू उद्देशीय इंग्रजी अध्ययन अध्यापन बोर्ड तयार करणे - ५ दिवस

३. अपेक्षित अध्ययन  घटकापुरता बोर्ड च्या वापरापूर्वी व वापरानंतर झालेला परिणाम अभ्यासने. त्यासाठी आराखडा तयार करणे . घटकांना अनुसरुण बोर्ड चा वापर करून  अध्यापन करणे - ३० दिवस

  ४. पूर्व चाचणी  व उत्तर चाचणी चे तयार करने . चाचणी चे मूल्यमापन करणे - ३ दिवस

५. मूल्यमापणातून प्राप्त महितीचे विश्लेषण करणे- १दिवस

६.दोन्ही चाचण्यामधून प्राप्त माहितीच्या आधारे उपक्रमाची परिणामकारकता पडताळणे - १ दिवस

७. नवोपक्रम अहवाल लेखन - ५ दिवस 

  🔹नवोपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे :-  

यूट्यूब लिंक :-   https://youtu.be/0NYraqDMSec


  🔹स्थळ :- सदर नवोपक्रमाचे नियोजन व कार्यवाही ही जि प शाळा गोवणे ता डहाणू येथे करण्यात आली .

🔹कालावधी :- सदर उपक्रम सुमारे दीड महिन्याच्या (५२ दिवस) कालावधीत पूर्ण करण्यात आला . 

🔹खर्च:- सदर नवोपक्रमासाठी श्री सुनील मेहरा यांनी बोर्ड शाळेस डोनेट केल्यामुळे हा उपक्रम निशुल्क रित्या पार पडला .

🔹उपक्रमाची कार्यपद्धती :-

  १. पूर्वस्थितीचे निरिक्षण व नोंदी :- 
 उपक्रमपूर्वी विद्यार्थ्याची पूर्व चाचणी घेण्यात आली . चाचणी साठी घटक व वेळ हे दोन निकष ठेवण्यात आले . सर्व घटकांसाठी पाच मिनिट एवढा वेळ प्रत्येक विद्यार्थ्यास निर्धारित करून दिला . चाचणी साठी पुढील घटक / निकष निर्धारित करण्यात आले होते .
अ)पाच मिनिटांत जास्तीत जास्त इंग्रजी शब्द अचूक लिहता येणे .
ब) पाच मिनिटांत जास्तीत जास्त इंग्रजी वाक्य अचूक लिहिता येणे. क) पाच मिनिटांत जास्तीत जास्त यमक जुळणारे शब्द लिहिणे .
ड ) पाच मिनिटांत जास्तीत जास्त संख्याचे अक्षरात लेखन करणे .
इ) तोंडी सांगितलेल्या शब्दांचे अचूक स्पेलिंग लिहिणे.
 फ ) मोठ्या शब्दांपासून छोटे पण अर्थपूर्ण शब्द तयार करणे .

२. प्रत्यक्ष कार्यवाही :- 

 अ) निर्धारित केलेल्या घटकांचे वेळा पत्रकानुसार नियोजित दिवशी विद्यार्थ्यांना बोर्ड च्या सहाय्याने अध्यापन करण्यात आले .
ब) सर्व घटकानुसार अध्यापन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा उत्तर चाचणी घेण्यात आली .
क) पूर्व चाचणी व उत्तर चाचणी चे मूल्यमापन करण्यात आले.
ड) दोन्ही चाचण्यांमधील विद्यार्थी संपादणुकीचे निर्धारित घटकांनुसार विश्लेषण करून खालील निष्कर्ष काढण्यात आले .

  
🔹 उपक्रमाची यशस्वीता / फलित/ निष्कर्ष :- 

सदर उपक्रम राबवल्यामुळे खालील सकारात्मक बदल दिसून आले.
१] असंख्य शब्द एकाच बोर्डवर तयार करता येत असल्याने नॅशनल रेकॉर्ड बुक मधे या उपक्रमाची नोंद झाली. 
२] कृतियुक्त , वैयक्तिक व गट पद्धतीने विदयार्थी शिकत असल्याने इंग्रजी विषयाची भीती कमी होवून अध्ययन आनंददायी झाले . 
३] शब्दलेखन करतांना अचुकतेचे प्रमाण (५०℅ पेक्षा अधिक)लक्षणीय रित्या वाढले . ४] वाक्यलेखन करतांना अचुकतेचे प्रमाण (३५℅ पेक्षा अधिक) लक्षणीय रित्या वाढले .६] इंग्रजी शब्द सम्पत्तिमधे वाढ झाली. (विद्यार्थ्यांच्या शब्द संपत्तिमधे सरासरी तिपटिने वाढ) ७] इंग्रजी वाचन आणि लेखन यामधे लक्षणीय प्रगती दिसून आली.
 ८] संख्यांचे अक्षरात लेखन करतांना अचूकता वाढली . (प्रमाण सरासरी ४०℅ पेक्षा अधिक )
 ९] इंग्रजी विषयाची गोडी निर्माण झाली .

🔹 परिशिष्ट 

बोर्ड ची रचना :-
बोर्ड च्या कडा लाकड़ी असून पृष्ठभाग पत्र्याचा आहे त्यावर सफ़ेद रंगाचे आवरण आहे .

त्यावर सव्विस उभे व सव्विस आडवे स्तंभ आहेत .

बोर्ड च्या तिन्ही बाजूस ए ते झेड पर्यन्त अक्षरे असून एका बाजूस अंक व चिन्ह आहेत.

ही सर्व अक्षरे बोर्ड वर राहण्यासाठी त्यांना मधोमध चुंबक लावले आहे .

आपल्याला हवी ती अक्षरे निवडून आपण बोर्ड वर असंख्य शब्द निर्मितीचा सराव घेवू शकतो .


🔹ऋणनिर्देश
सदर उपक्रमासाठी मला शाळा व्यवस्थापन समिति गोवणे तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्यांचे खुप  खुप आभार . मी बोर्ड चा आराखडा तयार केला मात्र तो प्रत्यक्षात येण्यासाठी रोटरी क्लब चे सदस्य श्री सुनील मेहरा यांनी मला मोलाचे सहकार्य केले . त्यांना माझी ही संकल्पना अतिशय आवडली व त्यांनी स्वतः च्या वर्कशॉप मधे माझ्या आरखड्यानुसार दोन बोर्ड मोफत बनवून दिले . त्याबद्दल  त्यांचा मी व माझी शाळा नेहमी ऋनाईत राहील. 

🔹संदर्भ सूची
१. नवोपक्रम लेखन मार्गदर्शिका 
२. माझे नवोपक्रम ब्लॉग 
३ SIRF फाउंडेशन वेबसाइट 
४ विविध ऑनलाइन उपलब्ध असलेले नवोपक्रम

Comments

Popular posts from this blog

शाळा डिजिटल करतांना

वृक्षारोपण एक पुण्यकर्म