thanks to VWF

वेदांत वेलफेयर फाउंडेशन चे आभार*
आमची जि प शाळा गोवणे ही दुर्गम व आदिवासी तालुक्यातील शाळा .शाळेत चारशे च्या आसपास आदिवासी गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .विद्यार्थ्यांना डिजिटल टेक्नॉलॉजि च्या माध्यमातून शिक्षण देता यावे व त्यांना विविध प्रकारची मदत सहित्याच्या रुपात मिळावी अशी आम्हा सर्व शिक्षकांची खुप् इच्छा होती .या साठी मी दाता शोधण्याचा प्रयत्न करत होतो .शेवटी मला वेदांत वेलफेयर फाउंडेशन  मुम्बई चे प्रमुख श्री रवि सर यांचा संपर्क मिळाला. मी त्यांच्या कडे शाळा व विद्यार्थ्यांना मदत मिळण्यासाठी विनंती केली. तशा प्रकारचा अर्ज आमच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून त्यांना सुपुर्द केला .श्री रवि सर यांनी अवघ्या काही दिवसातच शाळेस बेचाळीस इंचीचे तीन स्मार्ट टीवी भेट दिले. आम्हाला सर्व शिक्षकांना खुप् हरुप आला. मुलांना डिजिटल पद्धतीने शिक्षण देणे आता आम्हाला शक्य होणार होते .दरम्यानच्या काळात मी श्री रवि सर यांना विविध उपक्रमासाठी शाळा दत्तक घेण्याची विनंती केलि .त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवत आम्हाला शब्द दिला की तुमच्या विद्यार्थ्यांना शक्य ती सर्व मदत आमच्या फाउंडेशन च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करु. 
त्यानंतर त्यांनी आमच्या व शेजारच्या इतर शाळेतील मुलांना अतिशय दर्जेदार छत्री व बुटांचे वाटप केले. ही भेट मिळाल्यानंतर मुलांच्या चेह्र्यावरील आंनद काही औरच होता. आजही शाळेसाठी त्यांचा मदतीचा हात सुरूच आहे . शाळेस अत्याधुनिक दर्जाच्या वर्गखोल्या मिळवून देण्यासाठी सुद्धा आम्ही केलेली विनंती रवि सरांनी मान्य केलि . त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न देखील सुरु आहेत.
खरच वेदांत फाउंडेशन व श्री रवि सर यांचे आमच्या सर्वांतर्फे खुप् खुप् आभार व त्यांना पुढील कार्यासाठी खुप् खुप् शुभेच्छा .

विजय पावबाके
संगमनेर



Comments

Popular posts from this blog

माझा नवोपक्रम

शाळा डिजिटल करतांना

वृक्षारोपण एक पुण्यकर्म