नाती जपून ठेवा


  *नाती जपून ठेवा* 

थोडा उजेड ठेवा,अंधार फार झाला
पणती जपून ठेवा,अंधार फार झाला !!१!!

आले चहूदिशानी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला !!२!!

शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा अंधार फार झाला !!३!!

काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा अंधार फार झाला !!४!!

शिशिरातल्या हिमात हे गोठ्तील श्वास
हृदये जपून ठेवा अंधार फार झाला !!५!!     


ही सुप्रसिद्ध कविता आपण सर्वांनी अनेकदा ऐकली असेलच. वाचलीही असेल. ही कविता वाचत असतांना माझ्या मनाला नेहमी एक प्रश्न पडतो .नाती जपून ठेवा असे कवीला का बरे सांगावेसे वाटले असेल ?  रक्ताची किंवा विश्वासची, मैत्रीची नाती जपून ठेवा असे कवि एवढ्या अगतिकतेने का बरे सांगत असावेत?
         या विचारासरशी मन आत्मविश्लेषण करायला सुरुवात करते. एकामागोमाग एक अनेक प्रश्नांचे वादळ मनात घोंगवु लागते. 
जवळची नाती दुरावत तर चालली नाहीत ना ? जवळची नाती तुटण्याच्या तर मार्गावर नाहीत ना? गेल्या काही काळात किती नविन व् घट्ट नाती जोडली गेली आहेत ? किती नाती कायमचि तुटली गेली आहेत. हे आणि असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. आजचे युग स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेत टिकयचे असेल तर धावावे लागतेच् .जो थांबला तो संपला हे निश्चितच आहे. पण स्पर्धेत टिकन्यासाठी धावत असतांना जवळची ,रक्ताची नाती कायमचि मागे तर राहत नाहीत ना ?या स्पर्धेमुळे जर नात्यामधे अंतर निर्माण होत असेल तर ते अंतर कमी कसे होणार ?सोशल मिडियामुळे आपण सर्व एकमेकांशी जोडलो गेलो. एकमेकांचे सर्व अपडेट्स आपल्याला मिळत असतात .पण सोशल मिडियाच्या या   आभासी जगात नात्यांची नाळ घट्ट होण्याएवजी दिवसेंदिवस कमकुवत तर होत नाहिये ना ?या सर्व प्रश्नांची खुप गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे .कारण टेक्नोलॉजी च्या या युगात जग तर जवळ आलेय पण नाती मात्र दुरावत चालली आहेत. पैश्याचे संपत्तिचे महत्त्व अवास्तव वाढले आहे .या गोष्टींची थोडिशि जरी कमतरता निर्माण झाली तरी मानुस बैचेन होतो .अस्वस्थ होतो. त्याच्या मनाला चैन पड़त नाही. मात्र आपल्यावर जीवा्पाड प्रेम करणारी माणसे या संपत्ति पायी दुरावली तरी हल्ली कोणाला फारसे सोयरे सूतक दिसून येत नाही.
 जीवलग नात्यांची सर अन्य कोणत्याच् गोष्टीला येत नाही. नात्यांची उणीव वा कमतरता कोणत्याही संपत्तिने ,प्रसिद्धि व प्रतिष्टेने भरून येणे कदापिहि शक्य नाही. वेळ निघुन जाण्यापूर्वीच आपण नात्यांचे आपल्या जीवनातील अनमोल स्थान ओळखायला हवे  .या प्रसंगी लहानपणी शाळेत एकलेली एक   छोटीशी गोष्ट सांगाविशि वाटते.
     एक राजा होता .अतिशय लोभी .सोने सम्पत्तिचा लालसू. आपल्याकडे खुप् मोठ्या प्रमाणात सुवर्ण साठा असावा हीच त्याची एकमेव इच्छा होती. त्यासाठी त्याने कठोर तपश्चर्या करून देवाला प्रसन्न केले .देवाने प्रसन्न होवून राजाला सांगितले तुला हवा तो वर माग. लोभी राजा खुप् खुश झाला. पण अतिलोभाने त्याची बुद्धि भ्रष्ट झाली आणि घाई घाईत त्याने वर मगितला की
 हे ईश्वरा मला असा वर दे की मी ज्या वस्तुला हात लावील ती वस्तु सोन्याची होईल .ईश्वराने प्रसन्न होऊन वर दिला "तथास्तु ".
राजाला खुप् आनंद झाला .त्याने राजवाडयातील एका नक्सिदार खांबाला हात लावला .तर तो खांब पूर्ण सोन्याच्या झाला. राजाला खुप् आनंद झाला .अनेक वस्तुंना स्पर्श करून त्याने त्या वस्तु सोन्याच्या केल्या. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. अमाप सोने त्याच्याजवळ जमा झाले होते .एव्हना त्याला भूक लागली होती .सेवकांनी भोजनाची ताटे त्याच्या समोर ठेवली. राजाने जेवनासाठी एक घास हातात घेतला आणि काय आश्चर्य. ते अन्न सुद्धा सोन्याचे झाले .आता ते सोने खानार कसे? राजा खुप् निराश झाला .तसाच उपाशी पोटी ताटावरून उठला. तेवढ्यात त्याची लाड़की राजकुमारी "बाबा!बाबा|" असे म्हणत धावत आली .राजाने तिला उचलून घेण्यासाठी हात पुढे केले आणि काय दुर्दैव राजाचा स्पर्श होताच राजकुमारी देखील एका सोन्याच्या मूर्तित रूपांतरित  झाली .राजा ओक्साबोक्सी रडायला लागला .आता त्याच्या त्याच्या लोभीपना्चि खरी शिक्षा मिळाली होती .त्याच्या जवळ प्रचंड सोने होते पण प्रेमाची जिव्हाळ्याची नाती मात्र त्याच्या लोभापायी नष्ट झाली होती . त्याला खऱ्या अर्थाने जाणीव झाली होती की पैसा आणि संपत्ति यांचे आयुष्यातील स्थान नगण्य आहे .
       मित्रांनो आपण देखील या गोष्टीेपासून बोध घेणे आवश्यक आहे .वेळीच नात्यांचे महत्व् जाणून घेवून नाती जपायला शिकायला हवे. नाहितर राजा सारखीच पश्चातापाचि वेळ आपल्यावरहि येवू शकते .
            नाती घट्ट करण्यासाठी आपण काय करु शकतो किंवा काय करायला हवे त्यावर थोडा विचार करुयात.

*कुळ मेळावे*:- पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव एक खुप् सुन्दर संकल्पना परम्परेने राबवत आहेत. ती परम्परा म्हणजे कुळ मेळावे. वर्षातून एकदा हे कुळ मेळावे आयोजित केले जातात .शेतीची कापनी झोड़नी इत्यादि कामे पार पडली की तालुक्यातील, जिल्ह्यातील एवढेच नव्हे तर पर राज्यातील पण एकाच कुळातील सर्व लोक एका ठिकाणी जमतात. विचारांची देवानघेवान होते. एकमेकांच्या अड़ी अडचणी समजून घेतल्या जातात. त्या सोडवन्यासाठी सर्व जन शक्य ती मदत करतात .स्नेहभोजनाचा मोठा कार्यक्रम पार पडतो. नविन स्थळे शोधली जातात .आदिवासी बांधवांच्या या परम्परेचा आदर्श इतर समाजानेही घेणे काळाची गरज बनली आहे .यातून आपल्या कुळातील एकोप्याचि भावना वृद्धिन्गत होत असते . स्नेहबंध अधिक दृढ़ होत असतात.

*सण समारम्भ* 
दैनंदिन जीवनात कामाच्या निमित्ताने आपण जरी कितीही बिझी असलो तरी जवळच्या नात्यातील लोकांना सण समारम्भ च्या निमित्ताने भेट दया .केवळ सोशियल मीडिया वरून शुभेच्छा संदेश दिल्याने आपले कर्तव्य संपले या गैरसमजुतीमधुन बाहेर पड़ा .


*वेळ दया*  
 कोणतेही नाते दिर्घकाळ टिकवायचे असेल तर त्या नात्याला वेळ देण्याशिवाय पर्याय नाही .मी कामात खुप् व्यस्त आहे. माझ्याकडे अजिबात वेळ नाही अशी सबब जर तुम्ही देत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की अनेक प्रिय नात्यांपासुन तुम्ही नक्कीच दुरावले जात आहात. तेव्हा सुख दुःखाच्या प्रसंगात एकमेकांना वेळ दया .नाती टिकवण्याचा यापेक्षा उत्तम मार्ग दूसरा असुच शकत नाही.

*त्याग करा* 
एक बाब मनात पक्की ठासुन ठेवा की तुम्ही एखाद्या नात्यातून फक्त स्वतः चा स्वार्थच सिद्ध करत असाल तर त्या नात्याचा शेवट जवळ आला आहे असेच समजा. नात्यांची वेल ही त्यागाने बहरत असते .त्यामुळे हवी असलेली नाती टिकवायची असतील तर त्याग बुद्धि असणे खुप् आवश्यक आहे  .

*समजून घ्या* 
चुकतो तो माणूस हे आपणास माहित आहेच. जर जवळच्या व्यक्तिकडून काही चूक झाली असेल तर त्याला समजून घ्या. त्यामागिल कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा .वारंवार एखाद्या व्यक्तीच्या चुकांवर बोट ठेवल्यास ती व्यक्ति आपल्या जीवनातून दुरावली जाऊ शकते हे लक्षात असू दया .

शेवटी तुम्हाला एकच सांगावेसे वाटतेय .
    जीवन आहे खुप अनमोल 
    करु नका अति हेवा देवा
    घर करा सर्वांच्या मना मनात 
    आणि नाती जपून ठेवा

विजय पावबाके 
ता संगमनेर जि अहमदनगर
9730332580

Comments

Popular posts from this blog

माझा नवोपक्रम

शाळा डिजिटल करतांना

वृक्षारोपण एक पुण्यकर्म