Posts

Showing posts from December, 2017

thanks to RCTP

रोटरी क्लब ऑफ़ ठाणे पैराडाइस चे आभार  मोफत आयोजित केलि स्व संरक्षण कार्यशाळा *विद्यार्थ्यांनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे*   आजच्या काळात अत्याचार गुन्हेगारी वेगाने पसरत आहे. मुलांवरील  मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते.अगदी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचे  खून अपहरन झाल्याच्या घटना देखील आपण बातमीपत्रात वाचत आहोत न्यूज़ चैनल वर पाहत आहोत .या घटना टाळता येण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे . ही बाब लक्षात घेऊन मी रोटरी क्लब ऑफ ठाणे पॅराडाईस यांच्या सहकार्याने आमच्या गोवणे शाळेत शनिवार च्या दिवशी सकाळी कवायत ऐवजी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका  व सर्व शिक्षक यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.राज्यस्तरीय तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना विविध स्वसंरक्षणाच्या अॅक्टिव्हिटीजचे प्रात्यक्षिक करून दाखवले व ती सर्व प्रात्यक्षिके मुलांकडून करून घेतली.मुलांनी ब्लॉक ,डाऊनर फोरम, अप्पर फोरम, पंच, स्टेट पंच ,फेस पंच, किडो ,कॉलर lock ,हॅण्ड ब्लॉक ,थ्रो्स ,हिप थ्रोन्स ,हिपलॉक ,किक ,नि किक या संरक...

thanks to VWF

Image
वेदांत वेलफेयर फाउंडेशन चे आभार* आमची जि प शाळा गोवणे ही दुर्गम व आदिवासी तालुक्यातील शाळा .शाळेत चारशे च्या आसपास आदिवासी गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .विद्यार्थ्यांना डिजिटल टेक्नॉलॉजि च्या माध्यमातून शिक्षण देता यावे व त्यांना विविध प्रकारची मदत सहित्याच्या रुपात मिळावी अशी आम्हा सर्व शिक्षकांची खुप् इच्छा होती .या साठी मी दाता शोधण्याचा प्रयत्न करत होतो .शेवटी मला वेदांत वेलफेयर फाउंडेशन  मुम्बई चे प्रमुख श्री रवि सर यांचा संपर्क मिळाला. मी त्यांच्या कडे शाळा व विद्यार्थ्यांना मदत मिळण्यासाठी विनंती केली. तशा प्रकारचा अर्ज आमच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून त्यांना सुपुर्द केला .श्री रवि सर यांनी अवघ्या काही दिवसातच शाळेस बेचाळीस इंचीचे तीन स्मार्ट टीवी भेट दिले. आम्हाला सर्व शिक्षकांना खुप् हरुप आला. मुलांना डिजिटल पद्धतीने शिक्षण देणे आता आम्हाला शक्य होणार होते .दरम्यानच्या काळात मी श्री रवि सर यांना विविध उपक्रमासाठी शाळा दत्तक घेण्याची विनंती केलि .त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवत आम्हाला शब्द दिला की तुमच्या विद्यार्थ्यांना शक्य ती सर्व मदत आमच्या फाउंडेश...

नाती जपून ठेवा

  *नाती जपून ठेवा*  थोडा उजेड ठेवा,अंधार फार झाला पणती जपून ठेवा,अंधार फार झाला !!१!! आले चहूदिशानी तुफान विस्मृतीचे नाती जपून ठेवा अंधार फार झाला !!२!! शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे हरणे जपून ठेवा अंधार फार झाला !!३!! काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून घरटी जपून ठेवा अंधार फार झाला !!४!! शिशिरातल्या हिमात हे गोठ्तील श्वास हृदये जपून ठेवा अंधार फार झाला !!५!!      ही सुप्रसिद्ध कविता आपण सर्वांनी अनेकदा ऐकली असेलच. वाचलीही असेल. ही कविता वाचत असतांना माझ्या मनाला नेहमी एक प्रश्न पडतो .नाती जपून ठेवा असे कवीला का बरे सांगावेसे वाटले असेल ?  रक्ताची किंवा विश्वासची, मैत्रीची नाती जपून ठेवा असे कवि एवढ्या अगतिकतेने का बरे सांगत असावेत?          या विचारासरशी मन आत्मविश्लेषण करायला सुरुवात करते. एकामागोमाग एक अनेक प्रश्नांचे वादळ मनात घोंगवु लागते.  जवळची नाती दुरावत तर चालली नाहीत ना ? जवळची नाती तुटण्याच्या तर मार्गावर नाहीत ना? गेल्या काही काळात किती नविन व् घट्ट नाती जोडली गेली आह...