Thank you

माझे लेख

२००८ मधे माझे डी एड पूर्ण झाले .मी नोकरीच्या शोधात होतो .तेवढ्यात ठाणे जिल्हा परिषद च्या शिक्षक भरतीच्या जागा रिक्त असल्याची जाहिरात आली .मी अर्ज केला .मुलाखत झाली .माझी निवड सुद्धा झाली .डहाणू तालुक्यात मला पदस्थापना देण्यात आली .कोसेसरी नावाच्या शाळेवर मला हजर व्हायचे होते .मी बॅग भरली आणि शाळेत हजर होण्यासाठी निघालो .मनात अनेक प्रश्न होते .शाळा कशी असेल? तिथे शिक्षक कसे असतील ?मला तिथे करमेल का ? सर्वात मोठा प्रश्न होता राहयचे कुठे? हा सर्व विचार करत मी विचारत विचारत शाळेत येवून पोहचलो .अतिशय दुर्गम व् आदिवासी भागातील शाळा होती .तेथील लोकांची भाषा सुद्धा पुरेशी समजत नव्हती .तेथील एकूण परिस्थिति पाहून त्या गावात राहणे मला शक्य वाटत नव्हते .माझी भीती वाढत होती की ;मी बॅग घेवून जाणार कुठे ?शाळेत पोहचन्यासाठी मला चार वाजले होते. मी वर्गात प्रवेश केला .शिक्षकहि तिथे होते .सतेश पांडूळे त्यांचे नाव .माझ्यापेक्षा तीन चार वर्षांनी मोठे .आमचा परिचय झाला .मी न सांगताच त्यांनी माझ्या मनातील घालमेल ओळखली .ते म्हणाले आता शाळा सुटेल आपण माझ्या घरी जावु .मला खुप् हायसे वाटले .त्यांच्याच गाडीवर आम्ही घरी गेलो .वहिणींनी हसून माझे स्वागत केले .माझी बॅग ठेवली .रात्रि जेवण करून आम्ही अंथरुणावर पडलो .सतेश सर म्हणाले;" तुम्हाला चांगली रूम मिळे पर्यन्त तुम्ही इथेच रहा ,"माझ्या जीवत जीव आला. १० दिवस ते माझ्यासाठी रूम शोधत होते .शेवटी एक रूम मिळाली व् मी माझी बॅग घेवून नव्या रूम वर बस्तान बसवले .
       पण त्या अनोळख्या ठिकाणी त्यांनी मला आधार दिला .आसरा दिला .मला रूम मिळवुन दिली .एवढेच नाही तर अनेक वर्ष त्यांच्याच गाडीवर मी शाळेत जात होतो .त्यांच्यामुळे मला त्या ठिकाणी कोणताही त्रास झाला नाही.आज मला या ठिकाणी ९ वर्ष झाली आहेत. मी येथे वेल सेटल्ड झालो आहे .पण आजही मला ते सुरुवातीच दिवस आठवतात व सतेश सरांना वारंवार दोन शब्द सांगावेसे वाटतात "सर थैंक यू ".
थॅंक यू सो मच.

लेख 
विजय पावबाके
संगमनेर

Comments

Popular posts from this blog

माझा नवोपक्रम

शाळा डिजिटल करतांना

वृक्षारोपण एक पुण्यकर्म