आठवण
माझे लेख
लग्नानंतर एक नवीन व्यक्ति आपल्या आयुष्यात येते .सुरुवातीला एकमेकांचा स्वभाव सवयि आवडी निवड़ी जाणून घ्यायला जरा वेळ लागतो .हळू हळू प्रेमाचे आपुलकीचे एक घट्ट नाते तयार होते .एकमेकांची सवय इतकी होते की काही दिवस सुद्धा दूर राहिले की चुकल्यासारखे होते .
लग्नानंतर एक नवीन व्यक्ति आपल्या आयुष्यात येते .सुरुवातीला एकमेकांचा स्वभाव सवयि आवडी निवड़ी जाणून घ्यायला जरा वेळ लागतो .हळू हळू प्रेमाचे आपुलकीचे एक घट्ट नाते तयार होते .एकमेकांची सवय इतकी होते की काही दिवस सुद्धा दूर राहिले की चुकल्यासारखे होते .
आमच्याही लग्नाला वर्ष झाली होती . सरू व मी अतिशय मजेत राहत होतो. दोन वर्ष कधी एकमेकांच्या शिवाय राहन्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. रोजचे रूटीन कसे फिक्स झाले होते . सकाळी आरामात उठायचे गप्पा मारत चहा प्यायचा .मधेच एकदा विनोद झाला की खळ खळून हसायचे . रोज अंघोळीसाठी गरमागरम पाणी .नंतर गरमागरम नाश्ता व कामावर जातांना गरमागरम डब्बा .हे गणित पक्के झाले होते . दुपारी जेवतांना तिची आठवण आली की फ़ोनवर बोलणे व्हायचे. संध्याकाळी जातांना काहीतरी छोटेसे सरप्राइज घेवून जायचे . वेळात वेळ काढून समुद्र किनारी फिरायला जायचे .असे अगदी आनंदात दिवस जात होते .मधेच एक आणखी आनंदाची बातमी समजली .आम्ही आईबाबा होणार होतो .दोघेही प्रचंड खुश होतो .बोलता बोलता तिला सात महीने झाले. ती तिच्या माहेरी पहिल्या बाळंत पणासाठी गेली . बाळाच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहू लागलो .
पण इकडे मी घरात एकटाच पडलो होतो .सर्व बारीक़ सारिक गोष्टी मलाच कराव्या लागत होत्या .जेवण बनवने कपडे धुणे घर साफ करणे भांडी धुनें ही कामे बायकाच सफाइदार पणे करु शकतात .मला घडोघड़ी तिची आठवण येत होती. ती घरात नसतांना घर कसे खायला उठायचे .मन बैचेन व्हायचे .ती घरात असतांना कसे आनंदी उत्साही वाटायचे .फक्त फ़ोन वर बोलून तिची उणीव भरून येणे शक्य नव्हते. खऱ्या अर्थाने तिचे महत्त्व माझ्या लक्षात येत होते .एक दिवस खुप काकुळतीने तिला म्हणालो "तुझ्याशिवाय रहाणे नाही जमत आता प्लीज़ आपल्या बाळाला घेवून लवकर ये"
विजय पावबाके


Comments
Post a Comment