वाडघीन
*वाडघीन* लेखाचं शीर्षक वाचून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल वाडघीन म्हणजे काय? वाडघीन हा पालघर परिसरातील आदिवासी भागातील बोली भाषेतील शब्द आहे .वाडघीन म्हणजे आजी . प्रसंग आहे आमच्या शाळेतील २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली .पहिलीसाठी मुलांची नावनोंदणी सुरु झाली आणि काही दिवसांतच नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली .पहिलीचे बालगोपाळ रोज शाळेत येवू लागले. बऱयाच मुलांचे पालक पहिल्या दिवशी मुलांना शाळेत सोडून गेले आणि नंतर मुले रोज शाळेत येवू लागली .अशा प्रकारे पहिलीचा वर्ग सुरू झाला .पण पहिलीचा एक विद्यार्थी शाळेत बसून रोज मोठमोठ्याने रडायचा. मुले त्याला रडक्याच म्हणायची. हा रडक्या संपूर्ण वर्गात रडून मोठा गोंधळ करायचा .आता हा रडत असेल तर शिकवणार कसं ही मोठी पंचायत व्हायची शिक्षकांची. आता त्यावर उपाय काय? हाही प्रश्न पडला होता. त्याला कितीही समजून सांगितले तरी त्याचे रडणे काही कमी होत नव्हते .कारण त्याला घराबाहेर राहण्याची अजिबात सवय नव्हती आणि शाळेतले नवीन वातावरण पाहून तो अगदी घाबरून जात असे . त्यामुळे ...