Posts

Showing posts from July, 2018
Image
प्रारम्भ संस्था व इंडियन डेवलपमेंट फॉउंडेशन यांच्या मार्फत डहाणू तालुक्यात आशाएं 2018 उपक्रम राबवला जात आहे . या उपक्रमाचे हे सलग तीसरे वर्ष असून या वर्षी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे सोळा हजार विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व इतर सर्व आवश्यक स्टेशनरी चे वितरण केले जात आहे . विविध टप्प्यात हे वितरण सुरु असून आज चंद्रनगर केंद्रातील गोवणे वीरे खम्बाले ताम्बड़पाड़ा वनई मालकरीपाड़ा आदी शाळांना साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी  सरपंच सर्व शिक्षकवृंद  व ग्रामस्थ व टीम प्रारम्भ चे सदस्य उपस्थित होते . *आशाएं 2018 ह्या उपक्रमाचा सोळा हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार असून या उपक्रमाशी संबधित प्रत्येक दात्याचे व आशाएं  टिमचे विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने खूप खूप आभार*  विजय पावबाके